कुणाची आठवण का, कधी व कशी येईल याची उत्तर अजुन तरी मला सापडली नाहीत. बर्याच दिवसांपासून मी स्मिता (पाटिल) बद्दल लिहिन म्हणत होतो, पण काय लिहायाचं याचा प्रश्न होताच. ती आज आपल्यात नाही पण कुठून तरी अधून मधून टीवी वर एक झलक देवून जाते. काही दिवसांपूर्वी झी मराठी वर तिच्याबद्दल एक कार्यक्रम होऊन गेला. त्यात तिला ओळखणारी दिग्गज मंडळीही होती. स्मिताची बहीण, गौतम राजध्यक्ष वगैरे। मला तिचा आत्तापर्यंत आवडलेला सिनेमा 'उंबरठा'. तिचा साधा चेहरा आणि धारदार नजर सर्व विलक्षण आहे त्या सिनेमात. ती एक उत्तम कवयात्रिही होती असं त्या कार्यक्रमातून समजलं. आणि माझा अंदाज ही खरा ठरला. ती भावूक होती पण कमकुवत तर मुळीच नसनार. तिला जे जे पटलं ते ते तीनं केलं. spotboys शी दोस्ती केली, गरीबांना मदत केली आणि सहज अभिनय ही केला. तीनं अजुन जरा जगायला हवं होतं असं कधी मनात येतं. पण तिचे जे जे सिनेमे आहेत ते काहीतरी सामाजिक आशय असणारे आहेत (१-२ अपवाद असतील शराबी वगैरे). मराठी ने हिंदी चित्रपटांना खूप अभिनेत्री दिल्या पण सार्थ अभिनाची जोड़ आणि नितिमुल्यांशी तडजोड न करणारी एकमेव स्मिताच असेल. तिच्यावर चित्रित झालेल उंबरठा मधलं हे गीत ईथे आवर्जुन लिहावसं वाटते, हृदयनाथ मंगेशाकरानी छान अशी चाल दिलिये आणि गाणं कसं थेट काळजाला भिडनारं आहे.
सुन्या सुन्या मैफिलित माझ्या (सुरेश भट-ग़ज़ल)
सुन्या सुन्या मैफिलित माझ्या तुझेच मी गीत गात आहें
अजुनही वाटते मला की, अजुनही चांदरात आहें
उगीच स्वप्नात सावल्यांची.. कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला.. तुझ्याच जे अंतरात आहे
कळे न तू पाहुनी कुणाला॥ कळे न हां चेहरा कुणाचा
कसा तुला भास होत आहे.. तुझे हसू आरशात आहें
उगाच देवू नकोस हाका.. कुणी ईथे थांबणार नाही
गडे पुन्हा दुरचा प्रवासी.. कुठेतरी दूर जात आहे
सख्या तुला भेटतील माझे.. तुझ्या घरी सुर ओळखीचे
उभा तूझ्या अंगणी स्वरांचा.. अबोल हां पारिजात आहे
Monday, May 07, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment