परवा सा रे ग म प चा एपिसोड खुपच छान (आणि इमोशनल) झाला. जसा गायकांसाठी तसा माझ्यासाठीही. सगळ्यांनिच गानी छान म्ह्टली. विशेष प्रसाद ओक नी. त्याने ते अप्रतिम पेलल. आणि तिथेच माझाही कंठ दाटून आला अन डोळेही भरून आले. सौमित्रचे अमर्त्य शब्द आहेत आणि मिलिंद ने पण अप्रतिम चाल लावलिये.
"दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही,
क्षण एकही ही न ज्याला तुझी आठवण नाही"
हे असेल इमोशनल माणसाच लक्षन पण आजकल जगात ती भावना राहिलेयच कुठ? मग मी जसा आहे तसा बरा आहे. कोरड अन रुक्ष जगण्यापेक्षा तरी ते बर, नाही का?
माझे गाण्याबद्दलच वेड काही नवीन नाही (माझ्याकडे लहानपणीचा एक फोटो आहे, लांब मुलीसारखे केस अन हातात रेडियो :) ) ते वेड अजुन जपलय यातच सारा काही आलं !!
कीप इट अप सा रे ग म.
(प्रसाद ने म्ह्टलेलं "राधा ही बावरी, हरिची राधा ही बावरी" पण सुरेख)
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment