मी खूप विचार करत होतो की हृदयनाथ मंगेशकारानी त्या ध्वनिफितिला हे नाव का बर दिला असाव? खरच मित्र कितीतरी असतात. त्यातले असे कितीसे जिवाभावाचे? म्हणूनच त्यांना एखादाच मैत्र जिवाचा असणार. तसच काहितरी सुरेश भटांबद्दल त्यांना वाटले असेल म्हणून त्यांनी हे नाव दिलं असाव. "उजाडल्या वरी सख्या" गाणं मी पहिल्यांदा भावसरगम मध्ये ऐकल. दिदिंनी ते कैसेट मध्ये छानच म्हटलय पण हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजात ते अजुनच अप्रतिम वाटतं. मराठीतली ही अप्रतिम ग़ज़ल ऐकन्यासाठी भावसरगम ला आवर्जुन जा।त्यातली दोन तीन कडवी नमूद करतोय,
उजाडल्या वरी सख्या निघून जा घराकडे,
अजुनही उशिवरी टिपुर चांदणे पडे
उगीच वेळ सारखीविचारातोस काय तू?
पुन्हा पुन्हा मिठित ही शहारतोस काय तू?
पुन्हा अशी कधी कुणास रात्र सापडे ...
अजुन कुंतलात या तुझा न जिव गुंतला..
अजुन पाकळ्यातला मरंद ही न संपला
अजुन ही कसे तुझे लबाड ओठ कोरडे?
मंदार तू मला अपडेट देतोसच पण यावेळी मला ते मिस नाही करयाचय.
Thursday, May 24, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
Is this a new album? Googled for more information, couldn't find it. Could you please give me a link if its available for listening anywhere?
Thanks in advance
Post a Comment