Thursday, June 28, 2007

पाऊस आता पुण्यात हळूहळू दिनक्रमाचा भाग होतोय. पुनेकर ही त्याला जास्त नाव न ठेवता हसत आपलस करून घेतायत. खरच पहिल्या पावसाची धुंदी हळूहळू अशी का ओसरत असेल नाही? मी मागचे दोन दिवस वास्तव आणि कल्पनेच्या अंतराबद्दल विचार करत होतो. हाच पाउस कुणाला 'गारवा' सारखी प्रेमाची कविता सुचवतो तर कोणाला 'सर फक्त लढ म्हणा' सारखी वास्तववादी कविता सुचवतो. वास्तव आणि कल्पनेतलं हे अंतर खुपच मोठ आहे. ते फक्त काही थोडक्याच लोकाना पार करता येत. ही स्वप्नांची दुनिया खूप रम्य आहे. सहज हरवुन जाण्यासारखी आहे. आपण फक्त वास्तवतेच भान ठेवून स्वप्न पाहिली की झाल. असो.
नुकतच खांडेकरांच अम्रृतवेल वाचल. खुपच वास्तव कादंबरी आहे. 'श्यामची आई' जसा बालमनावर संस्कार करत तस् हे तरुण मनावर. ही माणसा माणसातल्या नात्यांच्या गुंता गुंतिची कथा खांडेकरानी खूप प्रगल्भ्तेनी मांडलेय. नंदाची होणारी घालमेल, तिच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार आणि शेवटी यासर्वातून तिने Phd करण्याचा घेतलेला निर्णय, हां सारा प्रवास आपल्याला खूप थक्क करून जातो. तिची आणि देवदत्त ची भेट आणि त्या दोघांमध्ये घडणारे संवाद ..सारेच अप्रतिम.

0 comments: