बरेच दिवस काही लिहल नाही. आणि सध्या प्रतिभा पाटिल राष्ट्रपति (की राष्ट्रपत्नी ही एक आणखी डोकेदुखी) झाल्या यापलिकडे काही घडलही नाही। शेवटी काय भैरोसिंघना हार मानाविच लागली. शहाण्या पुरुषाने स्त्री शी स्पर्धा करु नये, ती ही २१ व्या शतकात (...मी नाही असे वडीलधारे लोक म्हणतात). दैव कोणाला कुठे नेवून ठेविल काही खर नाही. पुन्याताले रस्ते त्यांच्या भेटिच्या वेळी सुधारतिल.. एवढाच काय ते त्यांच्या निवडून येण्यामुळे मला एक पुनेकर म्हणून झालेला आनंद. असो. मराठी माणसाने अटके पार झेंडा रोवला म्हणून जरा बर वाटलं.
एक तर आता सोफ्ट्वेअर कंपनी मध्ये ५ एवजी ६ दिवसांचा आठवडा होणार अशी वाइट्ट बातमी आहे. आधीच आम्ही बिचारे रोज १० ते १२ तास काम करतोच (त्यात पर्सनल जास्त नि ऑफिस चे कमी असते पण ऑफिस ये अन्दर की बात है ) मग आणखी एक दिवस सुखाचा का कमी असा समस्त सोफ्ट्वेअर कम्युनिटी तर्फे माझा सवाल आहे? एक तर इंडियन इकाँनोमीला सोफ्ट्वेअरमुळे असे चांगले दिवस पाहायला मिळतायत आणि रूपया वाढला तर सगळ्यात आधी बळी जाणार आमच्या सारखे निष्पाप जीव. बर याच्या विरुध्द टिवी चैनलवालेही बोलायला तयार नाहीत. आज दुपारी आज तक पहिला तर "सलमान म्यारी गोल्ड मध्ये किस नाही करणार" ही ब्रेकिंग न्यूज़! मग दिवस भर सगळ्या हिंदी सिनेमा मधली चुम्बन दृश्य दाखवली. अशाने काही दिवसाने लहान मूलं आई बाबांना म्हणतील "बाबा MTv नको.. आपण न्यूज़ बघू". हे झाल तर नंतर राखी सावंत (ही आज तक ला न्यूज़ पुरवत असते..मला शंका आहे की आज तक ने तीला हायर केलय).
एवढे प्रश्न आहेत देशासमोर पण यांना ते नाहीत महत्वाचे असो. काय होणार आपल?
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment