तुझ लाजून नजर खाली वळवण
अन माझा जीव हळूवार तुझ्यात गुंतत जाण
सारी स्रुष्टिच जनु त्या डोळ्यात अवतरली होती
कारण ती वेळच तशी होती
किती आठवाव अन मनात ते किती साठवाव
त्या गोड आठवणीत वाटते असच गढून जाव
तुच सर्व चैतन्यात सामावली होती
कारण ती वेळच तशी होती
Tuesday, July 24, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment