Thursday, January 03, 2008

जरा विसावु या वळणावर

नवे वर्ष आणि नव्या संकल्पना। सर्वांना नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा।

Wednesday, August 01, 2007

"जणू अंगी राघवशेला"..शीर्षक छान आहे... मी ते माझ्या कवितेला नाही देवू शकत, कितीही आवडलेलं असल तरीही. कवितेला नाव असाव अस थोडंच आहे? कविता लिहिताना कवीच्या मनात नाव नसत, असतो तो फक्त भाव.."आप सिर्फ मिठाई खाओ, आपको हलवाई से क्या मतलब?", ग्रेस साहेबानी म्हटल्या प्रमाणे !!

एक गंध हवा हवासा

निशिगंधाचा जसा रात्रीला
एक गंध हवा हवासा

पहिल्या पावसात जसा मातीला..

एक स्वर हवा हवासा
तुझ्या कंठातून जसा शब्दांना

एक स्वर हवा हवासा
झाडावर सळसळणारा जसा पानांना..

एक स्पर्श हवा हवासा
हळूच तुझ्या हाताचा माझ्या हातांना
एक स्पर्श हवा हवासा

अलगद तुझ्या ओठांचा जसा माझ्या कानांना..

एक स्वप्न हवहवसं
मला पडलेल तुझ्या विचारांत असताना

ज्यात म्हणतेस तू 'तुझिच मी' पावसात चिंब भिजताना....